BHARATIYA VIDYA BHAVAN'S
M. M. College Of Arts, N. M. Institute Of Science, H. R. J. College Of Commerce
(Autonomous 2020-30)
Established in 1946 | Re-accredited "A" Grade by NAAC | Munshi Nagar, Andheri (W), Mumbai - 400058
FYJC Admissions 2024-25
FYJC COMMERCE IT AIDED ANDकनिष्ठ महाविद्यालय (मराठी विभाग) आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या शाखांसाठी मराठी भाषेचा (द्वितीय भाषा) म्हणून अभ्यास केला जातो. आणि हा विषय शिकविण्यासाठी महाविद्यालयात एकूण तीन शिक्षक कार्यरत आहेत. १) ज्योती पराग मालंडकर २) आशा हुंबे पडळकर ३) अर्चना सतीश पवार. मराठी विभागातील शिक्षक विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तकाबरोबरच विद्यार्थी एक उत्तम नागरिक, सजग नागरिक घडावा म्हणून सतत प्रयत्नशील असतात.
(कनिष्ठ महाविद्यालय) मराठी विभाग अंतर्गत चार वेगवेगळ्या संघटना काम करीत आहेत.त्यांची नावे पुढीलप्रमाणे - १) ‘मराठी सांस्कृतिक मंडळ’, २) ‘नाट्यमंडळ’, ३) ‘विवेकवाहिनी’ व ४)‘स्नेहांकित हेल्पलाइन’. या चार संघटनांद्वारे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
On This Page
Staff Name | Educational Qualification | Designation | |
---|---|---|---|
![]() |
MRS. Asha Padalkar | M.A., B.Ed. | Co-ordinator |
![]() |
MS. Archna Pawar | M.A. , B.Ed. | Assistant Teacher |
‘मराठी संस्कृतिक मंडळा’तर्फे विद्यार्थ्यांना विचार करायला प्रवृत्त करणारी व्याख्यानमाला आयोजित केली जाते. त्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्यात येते. समाजातील प्रथीत यश मिळविलेल्या व्यक्तींची मुलाखत घेतली जाते. त्यातून विद्यार्थी मुलाखतीचे तंत्र अवगत करतात. विविध विषयांवर चर्चासत्र आणि मुलांच्या मनोरंजनाची सोय म्हणून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते.
‘नाट्यमंडळा’तर्फे विद्यार्थ्यांसाठी एक अथवा दोन दिवसाचे नाट्यशिबिर तसेच एकांकिकांचे आयोजन केले जाते. त्यासाठी लागणारी मदत विभागातर्फे केली जाते. शिवाय नाटकाच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना लागेल ती मदत केली जाते.
‘विवेकवाहिनी’ ही विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागवण्याचे कार्य करते. या संघटनेद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विविध शिबिरे घेतली जातात. शिवाय याच विषयावरील विविध व्याख्यानेसुद्धा आयोजित केली जातात.
‘स्नेहांकित हेल्पलाइन’ ही अंध आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक पुरविण्याचे काम करते. हे काम केवळ आपल्याच महाविद्यालयात नाही तर मुंबईतील विविध महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अंध व दिव्यांग मुलांच्या मदतीसाठीही आपले विद्यार्थी काम करतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या ध्येय्यापर्यंत पोहोचता येते. त्यातून डोळस विद्यार्थांना नवे मित्र-मैत्रिणी भेटतात. त्यांची कायमस्वरूपी मैत्री आणि घरोबा होतो. उदाहरणार्थ कृतिका पुरोहित हिला तिच्या यशापर्यंत पोहोचवण्यात आपल्या विद्यार्थ्यांचा मोलाचा वाटा आहे.
Upcoming