मराठी भाषा दिवस

 

लाभले आम्हास भाग्य मराठी

– अमराठी RPF जवान

     जागतिक मराठी भाषा दिवस. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

या दिनाचे औचित्य साधून बऱ्याच शाळा, महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा विषयक वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा इत्यादी अनेक स्पर्धांचे आयोजन केले जाते.

परंतु मुळात माझा मराठीची बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके हे ज्ञानेश्वरांचे बोल भवन्स महाविद्यालयाने खरे करून दाखवले.

मागील वर्षी २७ फेब्रुवारी २०१६ रोजी भवन्स महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वासंती कच्छी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली RPF मधील अमराठी जवानांमध्ये मराठी भाषा कौशल्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीकोनातून “रेल्वे पोलिसांसाठी मराठी भाषा: कामकाज व संभाषण कौशल्य” या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या वर्षी दि. २७ फेब्रुवारी २०१७ रोजी त्याची सांगता करण्यात आली.

त्या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. आनंद व्ही. झा Sr. Divisional  Security Commissioner, RPF यांच्या हस्ते करण्यात आले होते.

त्यानंतर दर शनिवार व रविवार RPF जवानांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. त्यानुसार त्या जवानांमध्ये मराठी भाषा: कामकाज व संभाषण कौशल्य साधण्यासाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्याने व प्रशिक्षण दिले गेले. त्याअंतर्गत जवानांच्या उपलब्ध वेळेनुसार एकूण ४६ जवान या प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहू शकले. जवानांमध्ये मराठी भाषा कौशल्यांचा विकास नेमका कितपत झाला आहे. हे पडताळण्यासाठी त्यांची मौखिक व लेखी परीक्षा घेण्यात आली त्या मूल्यमापनात एकूण २९ जवान विशेष प्राविण्यासह ही परीक्षा उत्तीर्ण झाले. खरे पाहता हीच या अभ्यासक्रमाच्या यशाची पावती आहे.

मराठी भाषा कौशल्याचा अमराठी भाषिकांमध्ये विकास साधून मराठी भाषा दिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला.

या अभ्यासक्रमांतर्गत दिल्या गेलेल्या प्रशिक्षणात RPF अमराठी जवानांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला. शिवाय त्यांच्या मनात मराठी भाषेविषयी आवडही निर्माण झाली.

सुरेश भट यांची रचना

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी

 

ही रचना RPF अमराठी जवानांनी प्रत्यक्षात अनुभवली व जगली.

साजरा केलेले चित्र :-

Slide1

 

 

या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी साजरा केलेला दिवस आणि मुंबई दैनंदिनात आलेले रिपोर्ट:-

मराठा जागर दिवस

Dhyas Marathi Saunvardhanacha

भवन्स महाविद्यालय, अंधेरी येथे या मराठी दिनाचे औचित्य साधून मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यावर आधरित काही कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित असलेल्या सर्वांनी वर्ग क्र. २०७ ,( लायब्ररी इमारत ) मध्ये मराठीत स्वाक्षरी करून हजेरी लावली. त्यानंतर ‘ लाभले आम्हांस भाग्य बोलतो  मराठी ’ या कवी सुरेश भट यांच्या कवितेचे गायन झाले.  बी. ए.च्या  तिस-या वर्षाच्या मराठीच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही मराठी ’ हे एक पथनाट्य सादर केले. विशेष म्हणजे या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन याच वर्गातील एक विद्यार्थिनी सायली जाधव हिने केले. छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती वर्णन करणारा एक पोवाडा बी. ए.च्या दुस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी गायला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी  एक लावणी, एक भक्तिगीत व ‘ मी मराठी ’ हे समूहगीत सादर केले. मराठी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सरोज पाटणकर यांनी जोतीबा फुल्यांना नमन करणारा पोवाडा म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. व्ही. आय कच्छी, उपप्राचार्य डॉ. ज्योती मोघे यांचे प्रोत्साहन व सहकार्य मिळाले. त्यासाठी मराठी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. सरोज पाटणकर यांनी त्यांचे आभार मानले. तसेच कार्यक्रम सादर करणा-या व उपस्थित असणा-या विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.